मुंबई : राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका सील केल्या आहेत. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पुन्हा एकदा केंद्र सरकार हे जाणीवपूर्वक आणि सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईवरुन पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र यांच्यातील वादाला तोंड फुटलं आहे. (ed action against cm uddhav thackeray brother in law and rashmi thackeray brother shridhar patankar sealed 11 flats at thane)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नेमक प्रकरण काय आहे?


2017 मध्ये 20 ते 30 कोटी रुपये पुष्पक बुलियन कंपनीने नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालाच्या माध्यमातून वळते केले होते. हवाला रॅकेट चालवणाऱ्या नंदकिशोर तिवारी या व्यक्तीने दोन तीन शेल कंपन्या उभ्या करुन ते पैसे दुसऱ्या कंपन्यांना दिले.


त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले असा आरोप आहे. याच प्रकरणासंदर्भात ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे. 


संबंधित बातम्या :  


राजकीय सुडापोटी कारवाई केली गेली - संजय राऊत


श्रीधर पाटणकर ईडी कारवाई : शरद पवार म्हणाले, ईडीचा गैरवापर वाढतोय