एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, जावयाच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ
एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) अडचणीत वाढ झालीये.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आलीये. त्यानुसार 20 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. याआधीही 15 आणि त्यानंतर19 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली होती. ही मुदत संपत असल्याने पुन्हा मुदतवाढ करण्यात आलीये. गिरीश चौधरी यांना ईडीने 5 जुलैला अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गिरीश चौधरी यांना अटक केली होती. (ED custody of Eknath Khadse son in law Girish Choudhary extended for a day till July 20 to pune money laundering case)
काय आहे प्रकरण?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरण
- सर्व्हे क्रमांक 52 मधील 3 एकर जागा
- ही जमीन अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून खडसेंनी पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3 कोटी 75 लाख रुपये देऊन खरेदी केली होती.
-स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले.
या व्यवहाराची नोंदणी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली.
ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती 99 वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाला. त्यामुळे खडसेंनी पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर खडसेंना पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. खडसेंनी 4 जून 2016 रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.