शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीची नोटीस
राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावले आहे. दाऊदचा हस्तक इकबाल मिरचीशी संबंधित एका प्रकरणासंबंधी ही नोटीस बजावण्यात आली आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.