Big Breaking : ईडीचं पथक घरी पोहोचताच प्रकृती अस्वास्थ्यामुळं आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल
800 कोटींचा बँकेचा टर्नओवर असताना 900 कोटींचा घोटाळा कसा, असा प्रतीप्रश्न
मुंबई : सिटी कोऑपरेटीव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढल्या असून, सोमवारी सकाळी ईडीचं एक पथक त्यांच्या री चौकशीसाठी दाखल झालं. यावेळी अडसूळ यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेनं थेट रुग्णालयात नेण्यात आलं. मुंबईतील लाईफ लाईन मेडिकेअर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, सिटी कोऑपरेटीव्ह प्रकरणात 800 कोटींचा बँकेचा टर्नओवर असताना 900 कोटींचा घोटाळा कसा, असा प्रतीप्रश्न अडसुळांनी केल्याचं कळत आहे. ईडीची कारवाई सुरु असतानाच अडसुळांना रुग्णालयात नेण्यात आलं. याचवेळी ईडीची एक टीम ही अडसुळांच्या घरी असून, दुसरी टीम त्यांच्यासोबत रुग्णालयात गेली आहे. पण, त्यांना स्ट्रेचरवरुन रुग्णवाहिकेत नेल्यामुळं शिवसैनिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली.
अडसुळांवर असणाऱ्या आरोपांअंतर्गत धाडी टाकल्या असता ईडीला काही ठोस पुरावे मिळाले. ज्यामुळं त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याचं चित्र ठळक होताना दिसत आहे. त्यामुळं या घडामोडीच्या साखळीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी 2021 पासून या प्रकरणाचा तपास सुरु असून आता ईडी महत्त्वाच्या टप्प्यावर आल्याचं कळत आहे.
नववीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचं वास्तव समोर आल्यामुळेच ईडीचं संकट मागे लागल्याचा आरोप अडसूळ यांच्याकडून करण्यात आला होता. पण, ईडीनं राजकीय दबावाचे हे आरोप फेटाळले असून, कागदपत्रांच्याच आधारे कारवाई सुरु असल्याचं स्पष्ट केलं.