कोल्हापूर जिल्ह्यात ईडीचे छापे
कोल्हापुरात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांने छापेमारी केली.
कोल्हापूर : जिल्ह्यात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांने छापेमारी केली. माजी नगरसेवक, बिल्डर, ड्रॉक्टर आणि सराफ व्यावसायिक यांच्या घरांवर हे छापे मारण्यात आले आहेत. या ईडीच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरसह इचलकरंजी, जयसिंगपूर इथे ही कारवाई सुरु आहे. दरम्यान, या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह फायली आढळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ईडीने आज कोल्हापूरमधील बांधकाम व्यवसायिक, सराफ व्यापारी, इचलकरंजी येथील माजी नगरसेवक, जयसिंगपूरमधील नामवंत डॉक्टर अशा चौघांच्या घरावर छापे टाकले आहेत. यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या संशय आहे. त्यामुळे हे छापे मारल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.
इचलकरंजीत अनेक उद्योग करून एका माजी नगरसेवकांने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवली आहे. हे करताना त्यांने कर चुकवेगिरी केली. तसेच शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने मोठया प्रमाणात मालमत्ता जमा केली आहे. जयसिंगपूर परिसरातील नामवंत डॉक्टरही दोन वर्षांपासून प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होता. त्याच्याही घरावर छापा मारण्यात आला आहे.
एका नामवंत बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम व्यावसायातून कोट्यवधीची माया जमा केल्याचे बोलले जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी घर, कार्यालय आणि साईटवर भेट देऊन मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. मात्र याबद्दल कमालीची गोपनियता बाळगली गेली आहे. दरम्यान, त्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आढळली तर संबंधीतांकडे त्याचे जाब जबाब विचारले जाणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.