ईडीने आत घेऊन पुजा करावी; मुख्यमंत्र्यांचे बरेच व्यवहार माहित आहेत - नारायण राणे
राऊत याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. नाही तर त्याचं तोंड बंद होणार नाही.
मुंबई : ईडीच्या अधिकाऱ्याने तीनशे कोटी घेतल्याचा आरोप राऊत याने केला. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्याने आता इतकं गप्प बसून घेऊ नये. त्याची थोडी पूजा करावी आणि विचारावं तीनशे कोटी कोणी घेतले ते दाखवा, नुसतेच आरोप करून थयथयाट करत आहेत.
राऊत याच्यावर ही अशी कारवाई व्हायलाच हवी. नाही तर त्याचं तोंड बंद होणार नाही. मंत्रीमंडळातले किती लोक आत गेले, किती लोक आत जाणार आहे, हे का नाही बोलत. पण, याचं सारखं आपलं पंतप्रधान मोदी, अमित शाहा, तुझी लायकी आहे का असा खरमरीत सवाल राणे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल त्याने आरोप केले. मात्र, पुरावे दिले नाहीत. जर काही पुरावे असतील तर ते दाखव. तुझ्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध डिस्पोजल केलेल्या केसेसबद्दल, झालेला व्यवहाराबद्दल तुझ्यापेक्षा मला जास्त माहित आहे. पण मी गप्प बसलो आहे, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.