शालेय मध्यान्न भोजनात पुलाव, मसाले भात; पण पैसे देणार कोण?
Shaley Poshan Aahar Yojana : मध्यान्न भोजनात मसाले भात, मटार पुलावसह; पैशांअभावी हे ताट कागदोपत्रीच राहण्याची शक्यता. काय आहे योजना? पाहा...
Shaley Poshan Aahar Yojana : काही महिन्यांपासून चर्चेत असणारा मध्यान्न भोजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, यावेळी मात्र येत्या काळात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार शालेय पोषण आहारात लवकरच बदल होणार आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळं आता त्यांच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिथं तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर विद्यार्थ्यांसाठी 3 Course Meal ची तरतूद केली जाईल. या निर्णानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात 15 वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब अशी, की त्यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद न केल्यानं प्रत्यक्षात या सूचना कागदावरच राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पोषण आहारात कोणकोणत्या पाककृतींचा समावेश?
शालेय पोषण आहारामध्ये अंडा पुलाव, भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मुगडाळीची खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण-भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?
नव्यानं आखणी केलेल्या पोषण आहारातील पजार्थांची चव राज्यातील 86 हजारांहून अधिक शाळांमध्ये असणाऱ्या 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना चाखता येणार आहे. या योजनेमध्ये स्थानिक फळं, अन्नधान्य आणि तृणधान्यांचा समावेश करण्यात आला आहे.