नवी मुंबई : पनवेलमधील पडघे गावानजीक असलेल्या कोळवाडी भागात सोमवारी सुमितकुमार राजू शर्मा हा आठ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषदेच्या कोळवाडी येथील शाळेमध्ये जात असताना रस्त्या शेजारील असणाऱ्या विहरित साप असून आपण पाहुयात असे सुमितने आपल्या मित्रांना सांगितले. परंतु मित्रांनी येण्यास नकार दिला. यावेळी सुमितने तुम्ही घाबरट आहात, असे बोलत स्वतः एक लाकडी काठी घेऊन विहिरीजवळ साप पाहण्यास गेला. 


यावेळी तोल गेल्याने सुमित विहिरीत पडला, पोहता येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली. घटना घडली असून पडघे गावावर शोककळा पसरली आहे.