`फाजील नेतृत्व आणि मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नसल्याने भाजपाचा पराभव`
भाजपासोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
जळगाव : भाजपासोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, हे पाहून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खंडीत गाठल्यासारखी टीका केली आहे. ' या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही,''अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
'ही निवडणूक म्हणजे अहम पणाचा पराभव आहे, मी पुन्हा येईन...ही भावना अजून गेलेली नाही, भाजपाला पुणे नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ देखील राखता आला नाही. लोकांचा आता भाजपावर कमी आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढत चालला आहे', असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांनी आपले भाजपामधील एकेकाळचे जवळचे सहकारी चंद्रकांतदादा पाटील यांनाही टोला लगावला आहे. 'भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात', असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
पक्षात हम करे सो कायदा अशांचा हा पराभव आहे, भाजपा नेतृत्व निवडणुकीत कमी पडले, महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.