मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : तिकीट दिलं नाही म्हणून मी काय शांत बसणारा आहे का? तर विकासकामांसाठी सरकारला बिल्कुल स्वस्थ बसू देणार नाही, वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे युतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेदरम्यान भाषणात केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सबका साथ सबका विकास' हा भाजपचा अजेंडा आहे, त्यामुळे मतदारांनी कमळालाच निवडावं आणि युतीच सरकार आणावं, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी उपस्थिताना केलं. सर्व मुद्दे मांडत असतांना एकनाथ खडसे यांनी नेहमीप्रमाणे मात्र आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.


एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकिट न देता, त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपचं तिकिट दिलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, यानंतर त्यांचं मंत्रिपद देखील गेलं होतं. याविषयी एकनाथ खडसे यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती.