जळगाव : मुक्ताईनगरमध्ये झालेल्या बंडखोरीबद्दल एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवर राग व्यक्त केला आहे. शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधून अपक्ष म्हणून रोहिणी खडसे यांच्यापुढे आव्हान उभे केलं आहे. हे तेच चंद्रकांत पाटील आहेत, ज्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, त्यावेळी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात 9 हजार मतांचं अंतर होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे, पण तो अद्याप मंजूर झालेला नाही, अशी माहिती शिवसेना बंडखोराने दिली आहे. हे आपण वर्तमानपत्रात वाचले असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. 



तर अशा बंडखोराचा राजीनामा मातोश्री कधी मंजूर करणार आहे, असा सवाल भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांना विरोधी पक्षांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसनं छुपा पाठिंबा दिला आहे.