COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे : धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेल्या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला. मेडिकल कॉलेज आणल्याने प्रश्न सुटत नसल्याचं सांगत त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.  


गिरीश महाजन यांना टोला


विकास कामं होत नसल्याने अस्वस्थता आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्यास नकार दिला. तर झोटिंग समितीच्या अहवालात अर्थ नसून त्याची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलं.