मुंबई : पुण्यात भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वारंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमीन व्यवहार (Bhosari MIDC land purchase) या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.


काय आहे हे प्रकरण?


- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचे प्रकरण
- सर्व्हे क्रमांक 52 मधील 3 एकर जागा
- सदर जमीन अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी - 3 कोटी 75 लाख रुपये देऊन खरेदी केली
- स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले
- या व्यवहाराची नोंदणी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली
- ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती 99 वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता
- खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाल्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते
- या आरोपांनंतर खडसेंनी 4 जून 2016 रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला



- याप्रकरणी चौकशी करण्यासाठी 23 जून 2016 रोजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमण्यात आली होती
- 30 जून 2018 रोजी या समितीने आपला अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला
- हा अहवाल अद्याप उघड करण्यात आलेला नाही
- मात्र या समितीने आपल्याला क्लीन चीट दिली असल्यानेच फडणवीस यांनी हा अहवाल उघड केला नसल्यााच दावा खडसेंनी केलाय
- मे 2018 रोजी याचप्रकरणी खडसेंनी अँटी करप्शन ब्युरोकडूनही चौकशी झाली
- या चौकशीत खडसेंना क्लीन चीट मिळाली होती
- 2016 पासून भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी चार वेळा खडसेंची चौकशी झाली आहे
- यात झोटिंग समिती, अँटी करप्शन ब्युरो आणि इन्कम टॅक्सचा समावेश आहे
- आता ईडीनेही या प्रकरणी खडसेंना नोटीस बजावली आहे