दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने झोटिंग समिती नेमली होती. या समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं आज, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक ठरतो, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत कारण याप्रकरणी कोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. लाचलुचपत विभाग प्रकरणाची चौकशी करत आहे. 



भोसरी जमीन खरेदी प्रकरण 


महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाले. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांची, एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली होती.


3 एकर जागेचा वाद


भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील 3 एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, 3 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. 


पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं म्हटलं जात आहे.