एकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा, सर्व समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र
Maharashtra Political Crisis : शिवसेनेत मोठे बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आता अधिक सावध झाले आहेत. भविष्यात कोणताही दगाफटका नको म्हणून एकनाथ शिंदे समर्थक सर्व आमदारांकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेतलं जात आहे.
कृष्णात पाटील / मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेनेत मोठे बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आता अधिक सावध झाले आहेत. भविष्यात कोणताही दगाफटका नको म्हणून एकनाथ शिंदे समर्थक सर्व आमदारांकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेतलं जात आहे. शिंदे गटावर आमरांना डांबून ठेवल्याचा आणि अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन आमदारांनी याबाबत मीडियाला माहिती दिली होती. त्यामुळे शिंदे गट सावध झाला आहे.
सर्व समर्थक आमदारांकडून घेण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट लिहून घेण्यात येत आहे. ज्यात सर्व आमदारांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत आणि आमच्यावर कुणीही जोर जबरदस्ती केलेली नाही, असा उल्लेख आहे. तसेच आम्ही स्वत:हून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटामध्ये सहभागी झालो आहोत, या आशयाचा उल्लेख त्यात असल्याचे आहे.
आमदार मुंबईत गेल्यानंतर भूमिका बदलतील, या भितीने शिंदे गटाकडून काळजी घेतली जात आहे. तसेच आमदारांना फसवून, जबरदस्तीने नेल्याचा शिवसेनेकडून वारंवार आरोप होत होता. त्यामुळे आता सर्व बंडखोर आमदारांकडून तसे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे.