Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणातील आताची सगळ्यात मोठी बातमी. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकार पडणार, असे म्हटले आहे. दरम्यान,  राष्ट्रवादी (NCP) पक्ष फुटणार नाही, उलट शिंदे सरकार (Eknath Shinde Govt)) पडेल, असा दावा यावेळी अजितदादा यांनी केला आहे.


'यानंतर सरकार पडणार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde - Devendra Fadnavis Govt) यांचे राज्यातील सरकार पडणार, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार यांनी केले आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडणार, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी ते म्हणाले राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही. मात्र, राज्यातील सरकार कोसळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार 16 आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असे बोलले जात होते. मात्र, आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केले आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे ते म्हणाले.तसेच 145 चा आकडा कमी झाला की सरकार पडणार, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.


शिंदे गटातील अनेक आमदार नाराज?


शिंदे गटातील कोणी आमच्या संपर्कात नाही. मात्र नऊ-दहा आमदार आमच्याजवळ बोलत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आम्ही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तेवढा संयम बाळगत आहेत हे देखील विशेष आहे, असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपकडून हे सरकार आणखी 15 वर्षे काम करील असे सांगितले जात आहे. मात्र, शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडूही नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रवादींच्या या दोन नेत्यांनी दावा केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झालेय.



तर दुसरीकडे  शिंदे सरकारच्या काळात वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. जुलै महिन्यातलं पत्र दाखवत अजित पवारांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच अजितदादांनी मंजूर केलेल्या कामांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्री लावली आहे. काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामांना नव्या पुणे पालकमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे.