ठाणे : शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची आई गंगुबाई शिंदे यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर ठाण्यातच उपचार सुरु होते. इथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ठाण्याच्या वागळे इस्टेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडतील. त्याअगोदर सकाळी लुईसवाडी या त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. 
 
एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते पदाचाही कार्यभार सांभाळत आहेत. गंगुबाई शिंदे यांच्या पश्चात पती संभाजी शिंदे तसंच एकनाथ, सुभाष आणि प्रकाश ही तीन मुले आणि तीन सुना, एक मुलगी, नातू, नातसूना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या त्या आजी होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, लोकसभा निवडणूक २०१९ साठी आज महाराष्ट्रातल्या १० जागांसाठी मतदान होतंय. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या जागांवर मतदान होतंय. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैंकी एक आहेत.