डोंबिवली : शिवसेनेच्या कारवाईला शिंदे गटाने उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे समर्थकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. शिंदे समर्थकांनी सामूहिक रित्या राजीनामे दिले आहेत. ज्यामध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख, शहर सचिव, शहर संघटक, विभाग प्रमुख, शाखा अधिकारी, युवा सेवा पदाधिका-यांचा समावेश आहे.


डोंबिवलीतील शिवसैनिकांनी पदाचा राजीनामा देत शिवसेनेला धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे मोठे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांचे समर्थक देखील आता आक्रमक झाले आहेत.


एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात डोंबिवलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला बसत आहेत. एकनाथ शिंदे यांना आता महाविकासआघाडीत राहायचं नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारावर पक्षाला पुढे नेण्यासाठी त्यांनी भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण उद्धव ठाकरे यांना हा प्रस्ताव मान्य नाही.


एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आहेत. तर 10 अपक्ष आमदारांचा देखील त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढील भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


पक्षाला वाचवण्यासाठी पक्षप्रमुखांकडून आता बैठकांचा सपाटा सुरु आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या देखील बैठका घेतल्या जात आहे.