मुंबई : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट आली आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाने मोठा धक्का दिला आहे. (Eknath Shinde removed from the post of group leader)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. कारण एकनाथ शिंदे सारखा मोठा नेता नाराज होते, पण पक्षाकडून त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेली नव्हती. अखेर त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला.


एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला पक्षाचे 55 पैकी 18 आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे इतर आमदार आणि नेते काय निर्णय घेतात याकडे ही लक्ष लागून आहे.


शिवसेनेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात.