मुंबई : Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणार आहे. आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. 


एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.  सागर बंगल्यावर शिंदे - फडणवीसांची भेट होणार आहे.  गोव्यातून मुंबईत आल्यानंतर शिंदे-फडणवीस भेट होणार आहे, असे सांगितले जात आहे.  एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह दुपारपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर  पुढील राजकीय सत्ता समीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. त्याआधी शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 



 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे.