चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ तर गडचिरोली जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली असून या साठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.  निवडणुकीच्या या कामात जवळपास ७०० महसूल विभागाचे आणि ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 


यावेळी सरपंच पदासाठी थेट मतदान होणार असल्यामुळे मतदानाची आणि त्यानंतर होणा-या मतमोजणी ची उत्सुकता वाढली आहे. थेट सरपंच निवडीमुळे राजकीय पक्षांच्या ग्रामीण भागातील ताकतीचा अंदाज देखील या वेळी येणार आहे. 
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यासाठी फारशी राजकीय रणधुमाळी झाली नसली या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यामूळे या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.