औरंगाबाद : शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या महापौर निवडणुकांमध्ये महापौर, उपमाहापौरंना जेवढे मतदान झालं त्याहून अधीक मतदान घोडेले यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सर्वाधइक मतं घेण्याचा विक्रम ते आज प्रस्थापित करतील असा अंदाज वर्तवला जातो आहे.


सेनेची महापौर पदाची दावेदारी असताना भाजपाने आपला महापौर बसवण्याची तयारी केली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्याने शिवसेनेचा महापौर पदाच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी देण्यात आली मात्र उपमहापौर पदासाठी भाजपात चांगलीच रस्सीखेच झाली अखेर पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी विजय औताडे यांचे नाव जाहीर केलं उर्वरित अडीच वर्षेही युती शहराचा विकास करेल असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.