मुंबई : कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचा पराभव केला आहे. १ लाख ६९ हजार ५८६ इतकी मते मिळवत ते विजयी झालेत. डॉ. शिंदे हे विद्यमान खासदार होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने  जोर लावला होता. मात्र, शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीला करता आलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पहिली निवडणूक २०१४ ला लढविली. या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या कल्याण मतदारसंघातून निवडून गेले. डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यामान खासदार आहेत. ते महायुतीचे उमेदवार होते. शिवसेनेकडून त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली.


डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते आपल्या कार्यपद्धतीमुळे मतदारसंघात लोकप्रिय होते, यावर त्यांनी विजय मिळवून शिक्कामोर्तब केले. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला. ते एमएस ऑर्थोपेडीक ( MS Orthopaedic) आहेत. ते केवळ २८ व्या वर्षी त्यांनी १६व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडणून आलेत. आता ते १६ व्या लोकसभेत शिवसेनेचे नेतृत्व करणार आहेत.



- राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे पराभवाच्या छायेत


- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.  १ लाख ४० हजार ८७३ मतांची आघाडी 


- शिवसेनेचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी चांगली आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे पिछाडीवर गेलेत. शिंदे यांनी १३ हजार १९२ मतांची आघाडी घेतली आहे.


 - कल्याण लोकसभचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडी यांची आघाडी कायम । 29568


शिवसेना - 42964श्रीकांत शिंदे 
राष्ट्रवादी - 13396 बाबाजी पाटील 
वंचित आघाडी - 7899 संजय हेडाव


- कल्याण लोकसभचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची आघाडी  26262


शिवसेना - 37192 श्रीकांत शिंदे 
राष्ट्रवादी - 10930  बाबाजी पाटील 
वंचित आघाडी - 7255 संजय हेडाव


- कल्याण लोकसभचे उमेदवार श्रीकांत शिंदे आघाडी 


शिवसेना - 2946  श्रीकांत शिंदे 


राष्ट्रवादी - 2000  बाबाजी पाटील


- कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे.


कल्याण 


कल्याण : कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती. शिवेसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी तब्बल २ लाख मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून ठाणे महापालिकेचे नगरसेवक आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.


२००९ चा निकाल 


शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना ४ लाख ४० हजार ८९२, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार २४३ तर मनसेचे राजू पाटील यांना १ लाख २२ हजार ३४९ मते मिळाली होती.