OBC आरक्षणाशिवाय 13 महापालिकांमध्ये निवडणुका? या दिवशी आरक्षणासाठी सोडत
१३ महापालिकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय 13 महापालिकांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 31 मे रोजी इतर आरक्षणासाठी सोडत काढणार आहेत. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित जागा निश्चित करणार आहेत.
13 महापालिकांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबई, औरंगाबाद महापालिकेचा यात समावेश नाही.
पुढील १३ महापालिकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.