पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड या पाणलोट क्षेत्रातील उजनीच्या पाणी सिंचनाच्या थकीत कर्जबाकीमुळे शेतक-यांच्या वीजपंपाच्या जप्तीचे आदेश देण्यात आलेत.


नोटीसा पाठवूनही थकबाकी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारंवार थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी कळवूनही ती भरली जात नसल्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी नोटीसा देण्यात आल्यात. त्यामुळे थकीत पाणीपट्टी असणा-या शेतकऱ्यांच्या वीजपंप जप्तीचे आदेश देण्यात आलेत.


पावणेचार कोटी रूपयांची थकबाकी



उजनी धरण पाणलोट क्षंत्रातील उपसा सिंचन योजना आणि खासगी शेतकरी यांच्याकडे पळसदेव, इंदापूर उपविभागाची सुमारे पावणेचार कोटीच्या आसपास थकबाकी आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.