आरोग्यमंत्री तानाजी सावंत इकडे लक्ष द्या... जिल्हा रुग्णालयात मोबाईल टॉर्चवर करावे लागतायत उपचार
Amravati News : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तब्बल तीन तास वीजपुरवठा बंद असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांचे हाल झाले आहेत
अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : अमरावती (Amravati News) जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा (Electricity supply) तीन तासांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे समोर आले आहे. ऐन उन्हाळ्यात या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्ण उकाड्याने हैराण झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील जनरेटरसुद्धा (generator) बंद असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनरेटर हे शोभेची वस्तू असल्याचे समोर आले आहे. मोबाईल टॉर्चवर डॉक्टरांना उपचार करावे लागत आहेत. या सर्व प्रकारानंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सध्या जिल्ह्यात मोठ्या उन्हाळा असल्याने प्रमाणात उकळा जाणवत असून प्रत्येकजण सावली शोधत असल्याचे पाहायला मिळत असून घरातील नागरिक कुलर आणि एसीचा आधार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला असून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा तब्बल तीन तासंपासून वीजपुरवठा खंडित झाला असून अतिदक्षता विभागातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून मोबाईलचा टॉर्च लावून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टर आणि नर्स यांच्यावर आली असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील रुग्ण उकाड्याने मोठ्या प्रमाणात हैराण झाले असून तीन तासंपासून लाईट सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून रुग्णालयातील जनरेटर शोभेची वस्तू बनल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात लाईट गेल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील तापमान चाळीस अंशाच्या पार गेले असून या सर्व प्रकारामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी ओलांडली होती. दुसरीकडे 7 ते 9 मे या कालावधीत जिल्ह्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.