सांगली : जिल्ह्यात आकडा टाकून वीज चोरी होत अल्याची माहिती महावितरण कंपनीला मिळाली. ही वीज चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, वीज चोरीचा आकडा काढून टाकल्याच्या वादातून कवठेमहांकाळमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ४१ वर्षांच्या रमेश दगडे या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, वीच चोरीच्या घटना घडत असताना ढालगाव सेक्शनमध्ये एक ट्रान्सफॉर्मर जळाला होता. ही घटना २८ एप्रिलची आहे. याबाबत चेकींग करण्यासाठी महावितरणचे दोन कर्मचारी गेले होते. त्यावेळी आकडा टाकून वीज चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे आकडे महावितरणकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकले. यावेळी वीजचोरी करणाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.


 या मारहाणीत जखमी झालेल्या रमेश दगडे यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मारहाण करणारे दोघे गुंड प्रवृत्तीचे आहेत. या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणने मदत करावी, अशी मागणी कंत्राटी वीज कामगार युनियनने केली आहे.