मुंबई: एल्गार परिषद प्रकरणाचा आरोप असलेल्या फादर स्टेन स्वामी यांचं निधन झालं आहे. 84 वर्षीय स्वामी पार्किन्सन आजारासह अनेक आजारांनी ग्रस्त होते. गेल्या वर्षीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एका डॉक्टरांनी ही माहिती दिली. स्टेन यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, होली फॅमिली हॉस्पिटलचे डॉ डिसूझा म्हणाले की, 'फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झालं आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ वकील मीहिर देसाई यांनी सुनावणीला सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले की काही म्हणण्याआधी डॉक्टर डिसूझा आपल्याला काही सांगू इच्छित आहेत. डिसूझा यांनी दिलेल्या माहितीनुसार फादर स्टेन यांना शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.



गेल्या महिन्यात NIAने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. फादर स्टेन स्वामींच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविला होता. त्यांच्या आजाराचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे म्हटले होते. एल्गार परिषद प्रकरणी देशात अशांतता निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप स्टेन स्वामींवर होता.


एल्गार परिषद प्रकरण 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या परिषदेत प्रक्षोभक भाषण करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलं होतं. पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांच्या भाषणानंतर त्याचे पडदास कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचाराच्या रुपात दिसले होते.