पुणे : पुण्यातील आकुर्डीत इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. सकाळी नऊच्या सुमारास आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ  हा अपघात झाला. हा विद्यार्थी सिम्बॉयसिस महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२२ वर्षांचा आशिष दीपक पाऊसकर हा आकुर्डीतील शुभश्री सोसायटीत राहत होता. आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता.


आशिष त्याच्या मित्रासोबत गुरुवारी सकाळी, अ‍ॅक्टिवावरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात असताना त्याला डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात तो जागीच ठार झाला. आशिषसोबत त्याचा मित्र देखील गंभीर जखमी आहे.आशिषच्या मित्रावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


पुण्यात डंपरने दुचाकींना धडक देण्याचे प्रकार वाढले आहेत, संबंधित अपघातात निगडी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.