Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमुळं राजकारण तापलं आहे. सर्व राजकीय पक्षाकडून निवडणुकांसाठी रणनिती ठरवण्यात आली आहे. अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला ईव्हीएम मशीन हॅककरून जिंकून देण्याचं आमिष देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केले आहे. भगवान सिंह चव्हाण असं संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने वसंत गीते यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या आनंद शिरसाट यांना आमिष दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने आनंद शिरसाट यांच्याशी संपर्क साधला होता. त्याने मला EVM हॅक करता येतं, असं सांगितलं होतं. EVM हॅक करुन मी निवडणुकीत विजयी करण्यासाठी मदत करु शकतो. मात्र यासाठी आरोपीने आनंद यांच्याकडे 42 लाखांची मागणी केली. पण त्यातले ५ लाख आत्ता द्या, अशीही मागणी त्यांनी केली. आनंद यांनी त्याची ही ऑफर नाकारली. तेव्हा त्याने म्हटलं की, निवडणूक आयोगातील प्रोग्रामिंग हेड माझ्या ओळखीचा आहे. त्यामुळं EVM मशीन आरामात हॅक करता येईल, अशी बतावणी त्याने केली. 


आनंद यांनी जेव्हा भगवानला नकार दिला तेव्हा त्याने पैसे न दिल्यास पराभूत करण्याची धमकी दिली. EVM मशीन हॅक करुन वसंत गीते यांना परभूत करेन, अशी धमकी आरोपी भगवानसिंह चव्हाण यांनी दिली. त्यानंतर भगवान सिंहविरोधात  मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. मुंबई नाका पोलिस ठाण्यात वसंत गीते यांच्या कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचने याची चौकशी करण्यास सुरू केली. 


पोलिसांनी केली अटक


नाशिकच्या पंचवटी येथून पोलिसांनी भगवान सिंह चव्हाण याला अटक केली आहे. चौकशीनंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. चव्हाण मूळचा राजस्थानचा असून गेल्या १५ दिवसांपासून म्हसरूळमध्ये कामाला होता. तो एका मार्बलच्या दुकानात काम करत होता. पैशांसाठी त्याने फोन केल्याचं चौकशीत म्हटलं आहे. पण या प्रकारामुळं EVM मशीन हॅक केलं जाऊ शकतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.