इंदापूर :  माझ्या शब्दाला सध्या कॉंग्रेसमध्ये किंमत राहिली आहे का नाही माहित नाही. असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. 74 व 75 साली कॉंग्रेस च्या विचारांची शिबिर होत होती, मात्र सध्या ती होत नाही. त्यामुळे चुकीच्या धैय धोराणांची सुधारणा करता येत होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी इंदापूरमध्ये हे वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आजकाल शब्दाला किती किंमत आहे हेही मला माहीत नाही. पण होती कधीकाळी. जूने सहकारी राजकारणात असताना शब्दाला काय किंमत होती हे माहीत आहे. आमची परंपरा ही मोठी विचारांची होती,  शिबीराची होती आता तो प्रोसेस संपलेला आहे. याचं दु:ख होतंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री, आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज इंदापूरमध्ये बोलुन दाखवलीय.


सुशीलकुमार शिंदे हे राज्याच्या  नियोजन मंडळाचे माजी  कार्यकारी अध्यक्ष रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात बोलत होते.