Suvarna Karanje: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते शिंदे गटात जात आहेत. त्याता आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडूपच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी पक्ष प्रवेश करणार आहेत. वर्षा या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश होत आहे. 


विशेष म्हणजे, संजय राऊतांना अटक झाल्यानंतर सुवर्णा करंजे या शिंदे गटाविरोधात आक्रमक झालेल्या दिसल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच  सुवर्णा करंजे यांचा शिवसेना, शिंदे गटात प्रवेश होत आहे. यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सुवर्णा करंजे यांचे सोशल मीडिया प्रोफाइल पाहिल्यास त्या एप्रिल महिन्यात कांजूर मार्ग येथे झालेल्या राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उद्धाटनावेळी उपस्थित होत्या. आमदार सुनील राऊत यांच्यामार्फत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यात महाड येथे झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.