विष्णू बुरगे, झी मीडिया,बीड : कुणाला कशाचा राग येईल याचा काही नेम नाही आणि राग आला की रागाच्या भरात कोण काय करेल हे देखील सांगता येवू शकत नाही. अशीच एक विचित्र घटना बिडमध्ये(Beed) घडली आहे. शेजारच्याचं कुत्र भुंकल म्हणून माजी अधिकाऱ्याने(Ex-officer) रागाच्या भरात भयंकर कृत्य केले. या अधिकाऱ्याने कुत्र्यावर(dog) थेट गोळ्या झाडल्या आहेत.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड मधील परळी वैजनाथ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडणारा हा व्यक्ती माजी  कृषी अधिकारी असल्याचे समजते. या अधिकाऱ्या घरासमोरच एक हॉटेल आहे. या हॉटेल मालकाचा कुत्रा मोठ्याने भुंकत होता. कुत्र्याचे भुंकने ऐकून हा अधिकारी चिडला.


पाठलाग करुन कुत्र्याला गोळ्या घातल्या


घरातील पिस्तुल घेऊन हा अधिकारी थेट हॉटेलजवळ गेला. हॉटेलच्या पार्किंग मध्ये त्याने कुत्र्याचा पाठलाग केला. यानंतर या अधिकाऱ्याने आपल्या जवळच्या पिस्तुलमधून कुत्र्यावर गोळ्या झाडल्या. बंदुकीची गोळी लागून कुत्रा जागेवर ठार झाला. 


मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो - अधिकाऱ्याचे उत्तर


कुत्र्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या हॉटेल मालकाने या  अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारला. मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो असे उत्तर अधिकाऱ्याने दिले. अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून कुत्र्याच्या मालकाला मोठा धक्का बसला. 
या घटनेमुळे हॉटेलमधील कर्मचारी देखील भयभयीत झाले आहेत. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाने तक्रार केली. त्यानुसार या माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. या अधिकाऱ्याकडे असलेली पिस्तुल परवानाधारक असल्याचे समजते.