नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीमुळं सुरू करण्यात आलेला वाद निरर्थक आहे, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. नागपूरच्या संघ मुख्यालयात शिक्षा वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सरसंघचालक सर्वात शेवटी बोलतात. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी या प्रथेमध्ये बदल करण्यात आला. मुखर्जी यांच्याआधी भागवतांचं भाषण झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते... त्यांनी तुरूंगवासही भोगला होता, असा दावाही भागवतांनी यावेळी केला.