धुळे : कर्जाने घेतलेल्या गाडीची कागदपत्र देण्यासाठी नाशिक एसीबी कार्यालयात गेलो असल्याचे भाजप नेते आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. माध्यम आणि अन्य ठिकाणी आपल्यावर प्रेम करणारी काही माणसं असल्याने खूप प्रसिध्दी मिळत असल्याचा उपरोधीक टोलाही त्यानी धुळ्यात माध्यमांशी बोलतांना लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक एसीबी कार्यालयात आपण कर्ज घेऊन घेतलेल्या गाडीची कागदपत्र द्यायला गेलो होतो,असे स्पष्ट करत माझ्या बाजूने एसीबीची चौकशी पूर्ण झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप माझ्या सोबत आहे असं आवर्जून सांगायला एकनाथ खडसे यावेळी विसरले नाहीत. 


फक्त नाशिक एसीबीची चौकशी बाकी असून अन्य चौकशीमंध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मात्र त्यांनी सावध भूमिका घेत बोलणे टाळले.