शिवसेना नगरसेवक महेश गायकवाडवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा
खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा
कल्याण : कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंत्राटदाराकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.
नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रभागात एका खाजगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम सूर आहे. महेश गायकवाड यांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या कंत्राटदाराने केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.