Maharashtra Crime News : लग्न झालेलं असताना बाहेर अनेक पुरूषांचे दुसऱ्या महिलेसोबत अफेर असतात. काहीवेळा ते समोर येतात तर काहीवेळा येत नाहीत. ज्यांचे समोर येतात त्यांचे तर संसार मोडल्याचं आपण पाहिलं आहे. असच एक प्रकरण समोर आलं आहे. एक विवाहित महिला त्याच्या बॉयफ्रेंडसोबत घरात बसली होती मात्र तितक्यात तिचा पती घरी येतो, मात्र त्यानंतर जे घडतं त्याची कोणीच कल्पना केली नसावी. महाराष्ट्रातील नाशिकच्या कमलानगरमधून घटना समोर आली आहे. (Nashik Marathi Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
विवाहित महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, तिचा पती बाहेर जाताच महिला प्रियकराला घरी बोलावून घ्यायची. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवायचे, नेहमीप्रमाणे तिचा पती बाहेर जातो आणि बॉयफ्रेंड घरी येतो मात्र त्यांना माहित नसतं की त्यांची शेवटची भेट होणार असते. कारण मध्येच त्या महिलेचा पती घरी माघारी परततो. 


पतीला असं अचानक घरी आल्याने दोघेही घाबरून जातात, महिलेचा बॉयफ्रेंड घाबरून घराच्या बाल्कनीमध्ये जातो. शेवटी तो पतीला दिसतो आणि तिसऱ्या मजल्यावरून तरूण खाली उडी मारतो. खाली पडल्यामुळे तरूण गंभीर जखमी होतो त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा होतात आणि त्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करतात. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू होतो. 


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिक हादरले आहेत.  कोणी विचारही केला नसेल की या प्रेमाचा अंत इतका वाईट होईल.