मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा
रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...
Pune News : पुण्यात हत्येची एक भयंकर घटना समोर आली आहे. चोरीचा बनाव करुन पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची मुलीसमोरच निघृण हत्या केलीय. शुक्रवारी मध्यरात्री उशिरा 1 वाजेच्या सुमारास वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तीन मुली घरात असतानाच अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केलीय. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय 42) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. राहुल हा एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होतो. शुक्रवारी रात्री घरी सर्व जण झोपले असताना अचानक रात्री 1 च्या सुमारास काही लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. राहुलने दरवाजा उघडता क्षणी चेहऱ्यावर मास्क लावलेल्या काही जणांना त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केला. राहुलच्या ओरडण्याचा आवाजाने पत्नी आणि तिन मुली बाहेर धावत आल्या. वडिलांवरील हल्ला पाहून त्यांना धक्का बसला. यानंतर त्या लोकांनी घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली.
झालेल्या सर्व प्रकार पत्नीने पोलिसांना सांगितला. पण मुली काही सांगण्याचा मनस्थितीत नव्हत्या. अशात पोलीस राहुलच्या पत्नीला वारंवार काही प्रश्न विचारत होती त्यावेळी त्या जबाबात त्यांना तफावत जाणवली आणि त्यांना संशय आला. हे प्रकरण चोरीचं नसून दुसरंच काही असल्याच पोलिसांना अंदाज आला. त्यांनी राहुलच्या पत्नीची कसून चोकशी केली असता त्यांना धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता पत्नीनेच प्रियकरांच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याचं पुढं आलं. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला देखील अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने राहुल यांची हत्या केल्याच कबूल केलं.
राहुल यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध याबद्दल राहुलला संशय आला होता. त्यामुळे राहुल पत्नीवर बारीक नजर ठेऊन होता. आपलं अनैतिक नातं राहुलला कळलं असल्याचा पत्नीला समजलं होतं. त्यामुळे तिने राहुल यांची हत्या करण्याचे ठरवलं होत. तिने प्रियकराच्या मदतीने या पूर्वी देखील राहुल यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो फसला होता.