अनिरुद्ध दवाळे, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अनेक गावे उन्हाळ्यात तहानेने व्याकूळ झाले आहेत. शेकडो गावातील नागरिकांना पाण्यासाठी रात्री-बेरात्री दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर वाट तुडवावे लागते अशी भयावह स्थिती दरवर्षी मेळघाटातील गावांमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावातून एक भयावह विडिओ समोर आला असून एका विहिरीत टँकरने पाणी सोडले असता शेकडो आदिवासी पाणी भरण्यासाठी गर्दी केल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे. आजही मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. 


सध्या मेळघाटातील १८ गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, मात्र मेळघाटातील पाणी समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. जेणेकरून मेळघाटातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटेल मेळघाटातील आदिवासी बांधवांना निदान पाणी मिळेल अशी मागणी मेळघाटातील आदिवासी बांधवांची आहे.


मेळघाटातील ५० पेक्षा अधिक गावात भीषण पाणीटंचाई


मेळघाटातील चिखलदरा तालुका हा अति डोंगराळ असल्याने चिखलदरा तालुक्यात दरवर्षी अनेक गांवात भीष पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत असते मात्र या वर्षीची परिस्थिती पाहता चिखलदरा तालुक्यातील 18 गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मेळघाटातील एकूण ५० पेक्षा अधिक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मेळघाटातील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी जंगलात वणवण फिरावं लागत आहे.


मेळघाटात सध्या १८गावात टँकरने पाणीपुरवठा....


सध्या मेळघाटातील १८ गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर पाच गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र मेळघाटातील पाणी समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. जेणेकरून मेळघाटातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटेल त्यामुळे ही दिर्घकालील उपयोजना होणार तरी कधी असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.