कल्याणः बुधवारपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईचे (Mumbai Rain News) जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. त्याचदरम्यान पावसामुळं लोकल अडकून पडलेल्या 6 महिन्यांच्या बाळाला घेऊन जात असताना बाळ हातातून वाहत्या नाल्यात पडले. आईच्या डोळ्यांदेखत बाळ वाहून गेले. 


सोशल मीडियावर फोटो व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण-ठाकुर्लीदरम्यान ही घटना घडली आहे. या बाळाचा शोध घेत असतानाच काल बाळ सापडल्याची चर्चा होती. सोशल मीडियावरदेखील तसे फोटोही व्हायरल होते आहे. मात्र, हे फोटो ठाकुर्लीतील घटनेचे नसल्याचे उघड झाले आहे. 


नाल्यात मुलगी वाहून गेली 


रिषिका रुमाले असं या चिमुकलीचे नाव आहे. रिषिका हिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. तिची आई योगिता रुमाले ही बुधवारी नेहमीप्रमाणे रिषिकाला घेऊन रुग्णालयात गेली होती. दुपारी रुग्णालयात निघून घरी निघाली होती. कल्याण- अंबरनाथ लोकलने ती निघाली होती. त्याचदरम्यान कल्याण - ठाकुर्लीमार्गात तासाभराहून अधिक वेळ लोकल उभी होती. त्यामुळं ते गाडीतून उतरुन चालत निघाले. 


आजोबांचा पाय घसरला 


योगिताही तिच्या वडिलांसह रुळांवरुन चालत निघाली होती. रिषिकाला तिच्या आजोबांनी घेतलं होतं. मात्र लोकल नाल्याच्या जवळून जात असताना आजोबांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातून बाळ खाली पडलं. लेक पाण्यात पडलेली पाहताच योगिताने हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलादेखील घटनास्थळी पोहोचले. मात्र रात्री उशिरापर्यंत बाळाचा शोध लागला नाही. 


21 तासांनंतरही शोध सुरुच


21 तासांनंतरही चिमुकलीचा शोध लागला नाही. एन डी आर एफ, कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाचे पथकाचे ठाकुर्ली खाडी परिसरात शोध कार्य सुरूच आहे. एनडीआरएफच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने बाळाचा शोध सुरु केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो खोटे आहेत. अद्यापही मुलीचा शोध सुरु आहे. 


ठाकुर्लीच्या या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूंचा बांध फुटला आहे.