Fact check | विदेशी झाडांमुळे तापमानात वाढ होते?
विदेशी झाडं लावल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विदेशी झाडं लावल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. अनेक ठिकाणी विदेशी झाडं लावण्यात आल्याने खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पोलखोल केली.मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol exotic trees cause temperature rise know what truth)
दावा आहे की विदेशी झाडांमुळे महाराष्ट्रातील तापमानात वाढ झालीय. विदेशी झाडं तापमानवाढीस कारणीभूत असतात असा दावा करण्यात आलाय. गुलमोहर, निलगिरी, रेन ट्री अशा प्रकारच्या अनेक परदेशी झाडांमुळे हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आसपासची जमीन नापीक केली.
झाडांची मूळं पाणी शोषून घेत असल्याने पाण्याचे प्रमाणही कमी होते असा दावा केलाय. या दाव्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. आमचे प्रतिनिधी योगेश खरे हवामान तज्ज्ञांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.
व्हायरल पोलखोल
विदेशी झाडांमुळे तापमान वाढते हा गैरसमज. पानगळ ही सर्वच झाडांची कमी अधिक होत असते. पानगळीमुळे जमिनीची उष्णता वाढते हा दावा निराधार आहे. भारतीय प्रजातीची झाडं पावसाळ्यामध्ये लावली पाहिजेत.
झाडं लावा झाडं जगवा अशी मोहीम सरकार चालवतं. झाडं ही लावलीच पाहिजेत. अशा दाव्यावर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत विदेशी झाडांमुळे तापमानात वाढ होते हा दावा असत्य ठरला.