अमर काणे, झी मीडिया, नागपूर : तुम्ही जर शोरमा खात असाल तर सावध व्हा...शोरमा आरोग्यासाठी घातक आहे असा दावा करण्यात आलाय. शोरमा खाल्ल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यानं आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol Shawarma dangerous to health know what truth what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दावा आहे की शोरमा खाल्ल्याने केरळमध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला. तर 54 जण आजारी पडले. शोरमा खाणं हे आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे शोरमा खाणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय. पण, खरंच शोरमा खाणं आरोग्यासाठी घातक आहे का,  याचा आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा. 



शोरमा खाणं आरोग्यास घातक ठरू शकतं.केरळमध्ये शोरमा खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.


हा दावा केल्यानं आम्ही याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केरळमध्ये शोरमा खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी खरी होती. पण, अनेकजण शोरमा आवडीनं खातात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर काणे एक्सपर्टना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याची सत्यता जाणून घेतली.


पडताळणीत काय पोलखोल झाली? 


शोरमा खाणं घातक नाही, पण रस्त्यावरील फूड खाऊ नये. मांस असल्याने ते ताजं वापरलंय का याची चौकशी करावी. रस्त्यावरील खाण्यावर धूळ बसू शकते त्यामुळे ते खाणे टाळावं. कोणताही पदार्थ असला तरी स्वच्छ असलेल्या ठिकाणी खावं. 


आमच्या पडताळणीत शोरमा खाणं घातक नसून, ते चांगल्या ठिकाणी खावं. उघड्यावरील अन्न खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाताना काळजी घ्यावी.