सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune News Today: पुणे रेल्वे स्थानक परिसरात लष्करी गणवेशात (Indian Army Uniform) फिरत असणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  रेल्वे स्थानकात फिरणारा हा तरुण तोतया असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. इतकंच नव्हे तर, या तरुणाने लष्करी गणवेशात 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावर (Red Fort) पासशिवाय प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News Today)


निरज विक्रम विश्वकर्मा (वय २०, रा. लटेरा, पो. धौराहरा, इटावा, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे या तोतया तरुणाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी निरज विश्वकर्मा याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्याच्या गणवेशावर नेमप्लेट, पैरा बॅच, लेफ्टनंट असल्याचे बॅच आढळून आला. तसंच, नीरज उत्तरे देण्याचे टाळत असल्यामुळं पोलिसांचा संशय अधिक बळावले. 


लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांनी नीरज यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले आहे.अधिक चौकशीमध्ये निरज विश्वकर्मा हा लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश घालून दिल्ली कॅटोंमेंट परिसरात फिरत होता. तसेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले होते. या वेळी त्याने लष्करी गणवेश घालून कोणताही पास नसताना प्रवेश केला होता. तेथे लष्करी अधिकाऱ्यांबरोबर भेटदेखील घेतली होती. 


निरजने बेकायदा लाल किल्ल्यावर प्रवेश तर मिळवला मात्र त्याने लष्करी अधिकाऱ्यांसोबत फोटोदेखील काढल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी या तोतया तरुणाला अटक केली आहे.