भोंदूबाबाचे महिला, तरुणीशी अश्लील चाळे; ८१ तोळ्यांचे दागिने जप्त
कुटुंबावर करणी केल्याचं सांगून कुटुंबाला गंडा घालणारा आणि महिला, तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदू बाबाकडून ८१ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम नाशिक पोलिसांनी हस्तगत केली.
नाशिक : कुटुंबावर करणी केल्याचं सांगून कुटुंबाला गंडा घालणारा आणि महिला, तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदू बाबाकडून ८१ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम नाशिक पोलिसांनी हस्तगत केली.
अंधश्रद्धाच्या नावाखाली भीती घालायचा
उदयराज पांडे असं या भोंदू बाबाचं नाव आहे. लोकांना गंडा घालत त्यानं कोट्यावधीची मालमत्ता जमवल्याच पोलीस तपासात उघडकीस झालंय. उदयराज पांडे हा केवळ अंधश्रद्धाच्या नावाखाली लोकांच्या मनात भीती घालत नव्हता तर महिला तरुणींना मोहजाळात अडकवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेलही करत होता.
अनेकांना गंडा घालत माया जमवली
भोळ्या-भाबड्या लोकांना गंडा घालत त्यानं बंगला, गाडी आणि सोनं-चांदी अशी मालमत्ता जमवली असून त्याच्या मालमत्तेचा शोध सुरु आहे. सोन्या-चांदीचे दागिने ज्या सराफांना विकले त्यांच्याकडून जप्ती केली जातेय.