Threat to Devendra Fadnavis : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब पेरल्याचा दावा करणारा कॉल नागपूर पोलिसांना आला. रात्री दोन वाजता आलेल्या या कॉलमुळे मोठी खळबळ माजली. पोलिसांनी कसून शोध घेतला असता तिथे बॉम्ब ठेवला नसल्याचे आढळले. पोलिसांनी हा फेक कॉल करणाऱ्याला नागपुरातून अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध सुरु केला आहे. फडणवीस यांना धमकीचा फोन आल्याचे पोलीस कंट्रोल रुमला फोन आला होता. चौकशीनंतर एका तरुणाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


धमकीचा फोन कॉल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा रात्री तैनात करण्यात आला होता. दरम्यान, धक्कादायकबाब म्हणजे घरची लाईट गेली म्हणून वैतागून त्याने पोलिसांना धमकीचा फोन केला होता. त्यानंतर हा फोन कट झाला. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क झाली. फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक पाठवण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला याणि घराची पूर्णपणे तपासणी केली. 


 Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात


दरम्यान, या आधी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा कॉल आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याने एका तरुणीचा मोबाईल नंबर कार्यालयात पैसे पोहोचते करण्यासाठी दिला होता. तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की,  आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जेलधूनच कॉल करण्यात आला असल्याचे स्पष्ट झालेय. जयेश कांथा ऊर्फ जयेश  पुजारी यांनीच फोन केल्याच प्रथमदर्शी दिसून येत आहे. एका तरुणी जी हॉस्पिटलमध्ये आहे तिच्याकडे  विचारपूस सुरु आहे.  स्थानिक पोलीस आणि सेंट्रल टीम गडकरी यांच्या सुरक्षेचा सातत्याने आढावा घेत आहे. लवकरच याची माहिती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.