पिंपरी चिंचवड : बनावट नोटांपासून वाचण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर येण्यासाठी देशात डीमॉनीट्यझेशन लागू करण्यात आले. परंतु यामुळे बनावट नोटा बनवणे काही थांबले नाही. बनावट नोटा चालवणारे एक रॅकेट नुकतेच उघडकीस आले आहे. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सध्या एका टोळीला ताब्यात घेतले आहे. जे लोकं 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटां बदली, लोकांना बनावट 5 लाख रुपये देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना अशी माहिती मिळाली की, या रॅकेटची मुळं ही गुजरातपर्यंत पोहोचली असण्याची शक्यता आहे. यावर मोठी कारवाई करत पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन 32 लाखांच्या बनावट नोटा ताब्यात घेत मुख्य आरोपीला अटक केली आहे.


हा तपास पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरातून सुरू झाला. पोलिसांना समजले की, एक टोळी लोकांमार्फत बनावट नोटींचे जाळे पसरवत आहे. या टोळीने लोकांमध्ये हे पैसे वापरण्यास देण्यासाठी एक चांगली युक्ती शोधली. त्यांनी लोकांना ऑफर उपलब्ध करुन दिली आणि सांगितले की 'एक लाख द्या आणि पाच लाखांच्या बनावट नोटा घ्या.'


या भामट्यांची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि बनावट नोटींच्या मुख्य सूत्रधारसह एकूण सहा जणांना अटक केली गेली आहे. या टोळीकडून 32 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या आहेत.


गुजरातमधील तीन आरोपींना अटक


अटक केलेल्या मुख्य आरोपी राजू उर्फ ​​रणजितसिंग खातूबा परमारसहित उर्वरित आरोपींची नावे गोरख दत्तात्रय पवार, विठ्ठल गजानन शेवाळे, जितेंद्र रंकनिधी पाणीग्रही, जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल, किरण कुमार कांतीलाल पटेल अशी आहेत. या आरोपींमध्ये विठ्ठल शेवाळे हे वन अधिकारी आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात पकडण्यात आले होते.


असा तपास केला गेला, सर्व आरोपी पोलिसांच्या हाती


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी राजू परमार यांना जितेंद्र कुमार पटेल आणि किरण कुमार पटेल यांच्याकडून छापलेल्या नोटा मिळायच्या. या बनावट नोटांचा त्यांनी एक आकर्षक व्हिडीओ बनवला होता.


मग हा व्हिडीओ आपल्या ओळखीच्या लोकांना ते दाखवायचे. व्हिडीओ दाखवून ते लोकांना त्याचे फायदे सांगायचे. त्यानंतर जे लोकं त्यांच्या बोलण्यात यायचे त्यांना ते त्या बनावट नोटा द्यायचे. राजू परमार यांनी जितेंद्र पटेल आणि किरण पटेल यांच्याकडून 50 लाख रुपये छापुन घेतले होते.


ही सर्व कामे राजू पटेल आतापर्यंत फोनवरूनच करायचे. या टोळीतील सगळी लोकं आजपर्यंत फक्त फोनवर एकमेकांना भेटले होते. ते कधीही समोरासमोर आले नाहीत. राजू हे काम मोठ्या सफाईने करायचा. यासगळ्यातून जे कमिशन मिळाचे ते तो सगळं या आरोपींमध्ये वाटून घेत असत.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाडयांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, आर.बी.बांबले यांच्या पोलिस पथकाने ही बनावट चलन चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मोठी कारवाई केली गेली आहे.