Sangali Crime News: तरुणाने एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणीचे थेट बनावट विवाह नोंदणी (Fake Marriage Certificate) पत्र तयार केल्याचा प्रकार घडला आहे. इतकंच, नव्हे तर बनावट विवाह नोंदणी पत्राच्या सहाय्याने सदर पीडित तरुणीला ब्लॅकमेल केल्याचंही उघड झालं आहे. सांगलीच्या (Sangali) वाळवा येथे ही धक्कादायक घटना घडली आसून पीडित तरुणीने तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आष्टा पोलिसांनी (Police) संशयित तौसिफ शेख याच्यावर अटकेची कारवाईदेखील केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीमागे लग्नाचा तगादा लावला होता. तिने नकार देताच त्याने बनावट विवाह नोंदणी पत्र तयार केले व त्याआधारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. सदर तरुणीही महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देऊन बदनाम केल्याचे तिने आरोपात म्हटलं आहे,


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे बनावट प्रमाणपत्र बनवण्यासाठी संशयित तरुणाने पीडित मुलीच्या शाळेतून संबंधित कागदपत्रे मिळवली होती. त्यानंतर वाळवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विवाह प्रमाणपत्रासाठी खोटी नोंदणी केल्याचे आत्तापर्यंतचे तपासात आढळले आहे. या घटनेमुळं पीडित तरुणी आणि कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सगळ्या प्रकारामुळं झालेल्या बदनामीमुळं शिक्षणदेखील अर्धवट सोडावे लागले आहे, असं पीडितेने म्हटलं आहे.


दरम्यान, आरोपीने तरुणीची बदनामी केल्यामुळं तिचे इतर ठिकाणीही लग्न जमणे मुश्किल होऊन बसले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित तरुण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं तिने म्हटलं आहे. पीडित तरुणाने थेट पोलीस ठाण्यामध्ये संशयित तौसिफ शेखविरोधात फिर्याद दाखल केली आहे.


आष्टा पोलिसांकडून संशयित तौसिफ शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, पीडित मुलीचे खासगी कागदपत्रे आरोपीला देणारे शाळेतील कर्मचारी आणि वाळवा ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आष्टा पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके


पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या बाळाच्या पोटावर चटके दिल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. नवजात बाळ रडत असताना त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी आई-वडिलांनी गावातल्या लोकांचे ऐकून त्याच्या पोटावर बिब्याचे चटके दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकारामुळे बाळाची प्रकृती आणखीनच खालावली आहे.