अहमदनगर : सावकारी जाचाला कंटाळून नगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पवार यांनी बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मंदीच्या काळात नगर जिल्ह्यातील धनाढ्य उद्योजकाने अशा प्रकारचे कृत्य केल्याने हळहळ व्यक्त होते आहे.


लिहून ठेवली सावकारांची नावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाचा तपास आता नगरचे कोतवाळी पोलीस करीत आहेत. बाळासाहेब पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांचं सावकारी कर्ज होतं. मरण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. 100 रुपयांच्या प्रतिज्ञा पत्रावर त्यांनी ज्या सावकारांकडून कर्ज घेतलं होतं त्यांचा उल्लेख असून यापैकी 4 जण नगरचे तर दोन सावकार बाहेरगावचे आहेत. पोलिसांनी यात कुणा कुणाची नावे आहेत हे अद्याप जाहीर केलं नसून पोलीस आता त्यांची चौकशी करीत आहेत. 


अनेकांना बसला धक्का


ओम उद्योग समूहाचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक बाळासाहेब पवार हे होते. आपल्या कार्यालयात रिव्हॉलव्हरने डोक्यात गोळी झाडून घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पवार हे ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून आणि जावई असा परिवार आहे.


पाहा व्हिडिओ