शिर्डी : कर्जमाफीचा पैसा नेमका कधी हातात पडणार याची बळीराजा प्रतिक्षा करत आहे. मात्र, आता यावर सहकरमंत्री सुभाष देशमुख यांनी भाष्य केलं आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीचा शुभारंभ झाला असून सोमवार पासुन तीन लाख खात्यात पैसे जमा होतील असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.


शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करण्यात येतोत त्याचाही देशमुख यांनी समाचार घेतलाय.



२००९ पासुनच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे, मागच्यावेळी १५८ कोटी अपात्र लोकांना दिली गेली त्याची वसुली अद्याप झालेली नाही असा टोलाही देशमुख यांनी विरोधकांना हाणलाय.