नागपूर: अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी आंदोलनातून एक दु:खद बातमी आली आहे. नागपूरमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने दूध फेको आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनात सहभागी झालेले जय जवान जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा आंदोलनानंतर लगेच मृत्यू झालाय. आंदोलनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यु झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


दूध ओतून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये जय जवान जय किसान संघटनेने रस्त्यावर दूध ओतून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. किसान महासंघातर्फे सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसंच शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी दूध रस्त्यावर फेकून नागपुरात हे आंदोलन करण्यात आलं. तसेच, काही गोर-गरिबांनाही दूध वाटप करण्यात आलं.


आंदोलनाचा आज चौथा दिवस


दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज नागपुरातही आंदोलन निदर्शने करण्यात आले... 'जय जवान जय किसान' संगठने च्या कार्यकर्त्यांनी आज सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करत काही दूध रस्त्यावर ओतून दिल तर काही दूध मात्र मोफत मध्ये लोकांना वाटण्यात आलं. यावेळी कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्या विराधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली... सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढला नाही तर ७ तारखेला मोठं आंदोलन करणार असल्याचे सुद्धा यावेळी या संगठने कडून सांगण्यात आलं.